श्री रणजितसिंह डिसले सरांनी जागतिक स्तरावरील ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त करून भारताची मान जगाच्या पाठीवर उंचावली

बार्शी येथील डिसले परीवाराच्या सत्काराप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांचे गौरवोद्गार.............

0
113

 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्थरावरील ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी बार्शी येथील डिसले कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन आदरणीय श्री डिसले सरांचा शाल, पुष्पगुच्छ व फेटा देऊन त्यांचा सपत्निक सत्कार केला.तसेच या या आनंदमय क्षणी डिसले सरांच्या यशामध्ये त्यांना घडविण्यासाठी अहोरात्र झटणारे त्यांचे आई-वडील यांचाही नामदार श्री भरणे मामा यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नामदार श्री भरणे मामा यांनी भारताला पहिल्यादाचं हा सन्मान मिळाला असून जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले सरांचा गौरव होणे ही नक्कीच माझ्यासहीत  प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सोलापुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सन्मानित होतो यापेक्षा अभिमानाची दुसरी गोष्ट नसून डिसले सरांनी यापूढील काळातही आपल्या कार्यकुशलतेने देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन देशाची मान उंचवावी त्यांच्या अशा प्रयत्नांच्या कामी  सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने डिसले सरांच्या पाठीशी सदैवपणे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगून डिसले सरांच्या पुढील वाटचालीस नामदार श्री भरणे मामा यांनी शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी बार्शीचे आमदार श्री राजाभाऊ राऊत, सोलापूर शहराध्यक्ष श्री संतोष पवार, जिल्हा परिषद सदस्या सौ राऊत ताई, श्री निरंजन भूमकर, श्री विक्रांत सावळे, डॉ अबीद पटेल,श्री राजकुमार पोळ, श्री सुरज ढमढेरे, श्री मिलिंद गोरे, श्री मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.

 

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160