मी पाहिलेले बाळासाहेब’; निंबध स्पर्धेच पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

0
68

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण:चिपळूण तालुका युवा सेना आयोजित हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्ताने ‘मी पाहिलेले बाळासाहेब’ निंबध स्पर्धेच पारितोषिक वितरण मंगळवारी शिवसेना सचिव खासदार लोकसभा गटनेते श्री. विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.स्पर्धेत प्रथम आलेल्या चार स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
चिपळूण तालुका युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते शहरप्रमुख निहार कोळे यांच्या संकल्पनेतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकी मी पाहिलेले बाळासाहेब ठाकरे ही निबंध स्पर्धा प्रचंड गाजली होती.खुल्या गटातील या स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत श्रीकांत मनोहर निवळकर (कात्रोळी) यांनी प्रथम तर कल्पेश आत्माराम पार्थी(विसापूर गुहागर) द्वितीय आणि अनंत कृष्णाजी दाभोळकर (खेर्डी)यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच अरमान इकलाक खान हा उत्तेजनार्थ परितोषकाचा मानकरी ठरला.या सर्वांना खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या वेळी जिल्हा प्रमुख श्री. सचिन कदम, माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेञप्रमुख श्री. बाळा कदम, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे, तालुका प्रमुख श्री. संदिप सांवत, शिवसेना तालुका समन्वयक श्री. राजू देवळेकर, युवासेना तालुका प्रमुख श्री. उमेश खताते, शिवसेना तालुका सचिव श्री. दिलीप चव्हाण, विभाग प्रमुख श्री. रुपेश घाग, युवासेना शहर प्रमुख निहार कोवळे, युवासेना उपतालुका अधिकारी श्री. महेश शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित होते.