दखल न्युज भारत’चे मुंबई महानगर प्रतिनिधी दिलीप अहिनवे यांना पितृशोक

0
220

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि.४ : ‘दखल न्युज भारत’, वेब पोर्टल ई-न्युज चे मुंबई महानगर प्रतिनिधी व मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षक दिलीप मोहन अहिनवे यांचे वडील कै.मोहन बाबुराव अहिनवे यांचे दीर्घकाळ आजाराने आज (शुक्रवार दि. ४ डिसेंबरला) रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन.

त्यांच्या पश्चात पत्नी सखुबाई, मुलगा दिलीप व शरद तसेच मुली सरिता किरण रोकडे व सुरेखा प्रविण जाधव व नातु मयुर, अजित व धनेश आहेत. आळेफाटा येथील ओम चैतन्य हॉस्पिटलमध्ये किडनीच्या आजारामुळे त्यांना दि.२२ नोव्हेंबर रोजी ॲडमिट करण्यात आले होते. डॉ.प्रितम गाडे (नेफ्रॉलॉजिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार घेऊन गुरुवार, दि.३ डिसेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आज सकाळी त्यांना त्रास होऊ लागला. त्यात त्यांना हलकासा हृदयविकाराचा झटका येऊन देवाज्ञा झाली.

ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सलग दोन पंचवार्षिक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणुक लढवुन भरघोस मतांनी निवडून आले होते. ओतूरमधील विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भुषविले होते. प्रामाणिकपणा, खोटे बोलणे कधीच आवडत नव्हते. कमी बोलणे परंतु नेहमी लोकांचा सहवास आवडायचा. आयुष्यभर त्यांनी शेती केली. हॉस्पिटलमध्ये असतानाही शेतीची काळजी करत होते. आमचे कांदे लागवड झाली का ? याबाबत सर्वांकडे विचारणा करत होते. मुलगा दिलीप मुंबई महापालिका शिक्षण विभागात शिक्षक म्हणून कार्यरत असून ते पत्रकार देखील आहेत तर दुसरा मुलगा शरद उत्तम प्रकारे शेती करत आहेत, मुलगी सरीता एल.आय.सी.मधुन सेवानिवृत्त झाल्या आहेत, तर छोटी मुलगी सुरेखा नायर हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ परिचारिका म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता ढमाले मळा-तांबे मळा-दाते वस्ती वैकुंठधाम, पो.ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे येथे करण्यात आला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
आम्ही ‘दखल न्युज भारत’ परिवार आपल्या दु:खात सहभागी आहोत.

🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻