साहेब,आमच्याकडे ऑनलाइन वर्गाठी साधन नाही जी ,आम्ही पाल्यांना कसे शिक्षण देणार?गोरगरीब वडिलांचा सवाल

203

 

वणी :- विशाल ठोबंरे

सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती असून जिकडे तिकडे लॉक डाउन वाढविण्यात येत आहे. शाळा कॉलेज महाविद्यालये सर्वत्र बंद आहे. काही शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहे. त्याकरिता अँड्रॉइड मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप च्या मदतीने शिक्षणाचे धडे वडील आपल्या पाल्याना देत आहे. मात्र ज्यांच्याकडे हे साधनच नाही अशानी करायचे तरी काय? असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. आपण आपल्या परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहलो मात्र आपली मुलं उच्च शिक्षित व्हावी या एकमात्र उद्देशाने चांगल्यात चांगल्या खाजगी तथा सरकारी शाळेत रात्रंदिवस राबराब राबून पै पै जमा करून पाल्याचा प्रवेश केला. मात्र अडाणी मायबापाने पाल्याला शिकविण्याची मजल मारली मात्र आता कोरोनाचा काळ आल्याने शाळेने ऑनलाइन वर्ग सुरू केले मात्र त्यासाठी लागणारे साधन महागडे असल्याने ते त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने असे पाल्य मात्र या ऑनलाइन वर्गापासून वंचित राहत असल्याने आई वडील मात्र याने कमालीचे नाराज आहे. मग ज्यांच्याकडे साधन नाही अशानी करायचे तरी काय? असाच सवाल गोरगरीब आई वडीला समोर उपस्थित होत आहे.
एकीकडे कोरोनामुळे जगणे अवघड झाले आहे काही ठिकाणी तर आई वडिलांचे हातचे कामं गेले तर कुठे अल्प कालावधी असल्याने हाताला काम नाही मग जगायचे कसे? पाल्य शिकत आहे, त्याला आपण चांगल्या शाळेत तर प्रवेश केला मग आता भयावह कोरोनाचा काळ आला त्याच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहे. मग आपल्याजवळ तर साधा मोबाइल सुद्धा नाही मग अँड्रॉइड सारखा महागडा मोबाईल आणायचा कुठून? असाच सवाल वडिलांच्या डोक्यात फिरत असून टीचभर पोटाची खडगी भागविणे या लॉक डाउन मध्ये कठीण झाले असून अशा या आलेल्या परिस्थितीमुळे आपला पाल्य मागे पडणार तर नाही ना? मग करावे तरी काय असाच काहीसा विचार डोक्यात घर करीत आहे.

मोबाइल फायनान्स कंपणीही म्हणते नवीन नको?….
मोबाइल फायनान्स वर मिळण्याची सोय सुद्धा आता उपलब्ध झाली असून मात्र ज्याने अजूनपर्यंत सरळ साध्या पद्धतीने आपले जीवनकार्य अविरत सुरू आहे त्यांनी आतापर्यंत कोणताही फायनान्स केलेलं नाही मग अशा गोर गरिबांना फायनान्स कंपनी मात्र आता सध्या कोरोनामुळे नवीन ग्राहक करता येत नाही अगोदर असेल तर पहा अशीच निराशा त्यांच्या पदरी पडत असल्याने त्यामुळे गोरगरीब पालक वर्ग मात्र चिंतेतच पडला आहे.