महाविकासआघाडी ने कोरची येथे साजरा केला विजयाचा जल्लोष

0
240

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची –
नुकतेच महामहाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने आपले एक वर्ष पूर्ण केले असून महाराष्ट्र सरकार व कार्यकर्त्यांसाठी गोड बातमी म्हणजेच नागपूर विभाग मतदार संघातील काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार एड. अभिजित वंजारी यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांचे पराभव केल्यामुळे आज कोरची येथे भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतिषबाजी व गुलालाने विजयाचा जल्लोष साजरा केला. नागपूर पदवीधर हे भारतीय जनता पक्षाचे गड मानले जात असल्यामुळे सर्वांचे लक्ष या निर्णयाकडे लागले होते. आज सकाळी अधिकृत निकालाची माहिती मिळताच एकमेकांना पेढे भरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय काँग्रेसचे श्यामलाल मडावी, मनोज अग्रवाल, हकीमुद्दीन शेख, सदरुद्दिन भामानी, सौ. हर्षलता भैसारे, राहुल अंबादे, धनराज मडावी, मनोज सोनकुकरा, धनीराम हीडामी, विठ्ठल शेंडे, आनंदराव मेश्राम, केवल भैसारे, वशिम शेख, बाबूलाल शेंडे, भुऱ्या पठाण, गेंदलाल मडावी, राजेंद्र गंधेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंग गजभिये, विनोद मोहुर्ले, स्वप्नील कराडे, चेतन कराडे, आनंद पंधरे, चंदू वालदे, हेमंत ढवळे, दत्तेश्‍वर दखणे, प्रशांत दखणे, राजू सहारे, विशाल जांभुळकर, राजू भैसारे तसेच शिवसेना पक्षाचे रमेश मानकर, डॉ. नरेश देशमुख, राजू गुरनुले, कृष्णा नरडांगे, यादव खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.