पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते रुई येथे विविध विकासकामांचे उदघाटन

0
139

 

निरा नरसिंहपुर दिनांक 4 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विविध विकासकामांचा उदघाटन समारंभ पार पडला. मौजे रूई येथे मोहन लावंड यांच्या घरापासून – रामा दादा वस्ती या रस्त्याचे खडीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ  मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रविण माने यांच्या शुभहस्ते पार पडला.

माने यांच्या सभापती फंडातून ९ लाख रुपयांच्या निधीतून हे विकास कार्य पूर्णत्वास जाणार असून कामाच्या गुणवत्तेबाबत मी स्वतः जातीने लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले.

याचसह तालुक्यातील रूई येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र बाबीर येथे भगत बांधव येथे सामाजीक सभामंडप उभारणीच्या कामाचाही शुभारंभ माने यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रविण माने यांच्या बांधकाम सभापती फंडातून ५ लाख रुपयांच्या निधीतून हे कार्य पूर्णत्वास जाणार आहे.

आजच्या या दोन्ही भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने  यशवंत कचरे, पद्माकर लावंड सर, अजितसिंह मारकड पाटील, बबन मारकड, संभाजी मारकड, सर्जेराव मारकड सर, संतोष पांढरमिसे, चेतन मारकड, बाळासो भगत, संजय भगत, संदीपान भगत, रोहिदास कांबळे, बंडू डोंबाळे, पांडुरंग डोंबाळे, नशीबभाई मुलानी, मोहन लावंड, भारत लावंड, ज्ञानेश्वर माने, अशोक मारकड, गिताजी लावंड, आण्णा लावंड व इतर मान्यवर उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160