कोलाम समाजाच्या आदिवासी तरुणाची यशोगाथा.. — धन्य ती मायमाऊली..

0
506

 

रोहन आदेवार
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ

यवतमाळ: आदिवासी कोलाम समाजामध्ये जन्म घेतलेल्या विनोद वाडेकर व त्यांची पत्नी सौ.वर्षा विनोद वाडेकर हे दाम्पत्य सध्या मंत्रालय,मुंबई येथे कार्यरत आहेत.यवतमाळ जिल्ह्यातील विनोद वाडेकर यांचा जन्म मौजा उत्तरवाढोना येथे झाला असून,ता.नेर मध्ये हा गाव येतो आहे.

जन्मापासून वडिलांचे छत्र नसलेल्या विनोद वाडेकरांचे सम्पूर्ण बालपण व शैक्षणिक जिवन मामाकडे गेले.अशिक्षित असलेल्या आईने, बालपणापासूनच “त्यांच्या मनात,शिक्षणाने माणूस मोठा होतो हे संस्कार बिंबवले होते.आर्थिक परिस्थिती जिकरीचे असली तरी त्याचा बाहू शिक्षणामध्ये करायचे नाही हा कानमंत्र जन्मदात्या आईने दिला आणि हलाखीच्या परिस्थितीने सुद्धा विनोद वाडेकरांना उच्च शिक्षित केले.हालाकिच्या परिस्थिती मध्ये शिक्षण घेण्यासाठी अविरत प्रेरणादायी ठरलेली विनोद वाडेकर यांची आई धन्यच!

अप्रगत कोलाम समाजाची आर्थिक परिस्थिती नेहमी हलाखीची असते,मात्र परिस्थितीला न डगमगता गावातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत 10 वी पर्यत शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर उच्च शिक्षणासाठी यवतमाळ येथे गावातून ये जा करून उच्च शिक्षण पूर्ण केले.

बालपासून योग्य ते शिक्षण घेऊन गावातील प्रत्येक युवकाने यशाचे शिखर गाठावे म्हणून सन 2007 मध्ये 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गावातील विध्यार्थ्यांना कोचिंगच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देणे विनोद वाडेकर यांनी चालू केले आणि कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून उच्च शिक्षणाचा पल्ला गाठला.

त्यांनतर त्याची नियुक्ती MPSC मार्फत सन 2012 मध्ये मुंबई येथे झाली.याप्रमाणेच त्याची पत्नी सौ वर्षा वाडेकर यांनी सुद्धा आदिवासी आश्रम शाळेत शिकून MA पर्यतचे शिक्षण पूर्ण केले व. MPSC मार्फत कोलाम समजातीतील पहिली मुलगी थेट मंत्रालयात 2014 मध्ये रुजू झाली..या दाम्पत्यानी नोकरी नंतर सुध्दा समाजाची व गावाची नाळ टिकवून ठेवली..

कोलाम समाजा मध्ये शिक्षणाचा अभाव असून बहुतेक तरुण व्यसनाकडे वळले आहेत,समाजाची व्यशनाधिन दैनास्थिती दूर व्हावे यासाठी समाजातील तरूणांना सातत्याने मार्गदर्शन वाडेकर दाम्पत्य करीत असतय.

वाडेकर दाम्पत्य यांनी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतुन शिक्षण पुर्ण केले असल्यामुळे विद्यार्थी जीवनात येणाऱ्या अडचणीची जाण त्यांना आहे.म्हणून विध्यार्थ्यांना पोडात मोफत लायब्ररी चालू करण्याचा संकल्पना शंकर उकंडे,नवनाथ राऊत, दीपक मेश्राम,आदी युवकांपुढे मांडली आणि त्यांचा होकारार्थी प्रतिसाद मिळाला..

मोफत ग्रंथालयाचे कोलाम समाज बांधवांना महत्व पटवून देऊन त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कोलाम पोडामध्ये दि.21 नोव्हेंबर 2020 रोजी ग्रंथालयाचे लोकार्पण केले..सध्या ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा, शालेय विध्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके, कादंबऱ्या, आत्मचरित्र, नागरिकांसाठी नियमांची अशी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत.

या उपक्रमाचा इतर तरुणांनी सुद्धा बोध घेऊन गाव तेथे ग्रंथालय चालू करून ग्रामीण भागातील तरुणांना अभ्यासासाठी इतरत्र भटकंती न करता गावातच मोफत अभ्यासिका चालू केल्यास शिक्षणाची जिद्द असणारे विध्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे वंचित राहणार नाही अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि कोलाम पोडतील अंधश्रद्धा व व्यसनाचे प्रमाण कमी होऊन शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.तद्वतच मागास असलेला समाज दुसऱ्या दिवसापासून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल…असा आशावाद वाडेकर दाम्पत्याला आहे.