छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करणार- आमदार अमोल मिटकरी

0
208

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे
आयएएस,आयपीएस या मोक्याच्या जागा हेरा असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते.अभ्यासाच्या पलीकडची चौकट असते.माणूसकीच्या भिंती आपल्याला जपायच्या असतात.तुम्ही कितीही प्रगत असले कितीही हुशार असले कितीही विद्वान असले तरी देशातील जातीव्यवस्था संपत नाही.अभ्यासिकेला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे.छत्रपती शिवाजी महाराज
अभ्यासिकेच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर करणार असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.
कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आमदार अमोल मिटकरी हे होते.तर कैलास थोटे,रामप्रभु तराळे,राजीव खारोडे,प्रविण बोंद्रे,राम म्हैसने यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन व हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ललित नगराळे यांनी तर आभार अमोल किटके यांनी मानले.उपस्थित मान्यवरांनी स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले.चित्रकार गौरव नगराळे यांनी आमदार अमोल मिटरींना सुंदर चित्र भेट देऊन सन्मानित केले.आमदार मिटकरींनी १५ वर्षापासून रक्तदान करणारे जयंत लोखंडे व श्रीधर तळोकार यांचा सत्कार केला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी करुणेश मोहोड,योगेश काळे,सुमित नगराळे,राहुल मोहोड,सुहास किटके,विपूल जवादे,संघर्ष मुनेश्वर,आकाश मुऱ्हेकार,विशाल नगराळे,अक्षय नाथे,योगेश इंगळे,गोपाल गणोरकार,अमर वावरे,अक्षय तेल्हारकर,आशिष गव्हाळे,निखील नगराळे,दत्ता राऊत,भूषण केदार,श्रेयश निमकर,प्रसाद पुडके,देवांग सिरसाट,पल्लवी गणभोज,काजल जांभळे,ज्योत्स्ना चवरे,दिव्या इंगळे,शुभांगी पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.