Home नीरा नरसिंहपूर माजी सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांचे दुधदर वाढीसंदर्भात इंदापूर तहसीलदारांना निवेदन..

माजी सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांचे दुधदर वाढीसंदर्भात इंदापूर तहसीलदारांना निवेदन..

225

 

नीरा नरसिंहपुर दिनांक 21 : प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

राज्यभरात दूधाचा प्रश्न पेटला असून  भारतीय जनता पार्टीसह घटक पक्षाकडून संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी सरकारला जाग आणन्यासाठी निवेदने देत काही आंदोलनेही होत आहेत. याच पार्श्वभूमीवर इंदापूर मध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसील कार्यालयात तहसीलदार सोनाली मेटकरी यांना लेखी निवेदन देण्यात आले. याच बरोबर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खास मुख्यमंत्र्यांसाठी गायीच्या दूधाची किटली भेट म्हणून देण्यात आली.

या निवेदनाव्दारे राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या असून प्रामुख्याने गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रू. अनुदान, दुध भुकटी करीता प्रति किलो ५० रू. अनुदान, शासनाकडून ३० रू. प्रति लिटरने दुधाची खरेदी व्हावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतक-याचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या काळामध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे.

त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुध्दा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रू. प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केली जात आहे. काही ठराविक दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकर्‍यांना व दुध उत्पादकांना शासनाने वा-यावर सोडले आहे. असे मुद्दे निवेदनात मांडले असून गायीचे पवित्र दुध मंत्री मंडळातील सर्व सहका-यां करिता पाठवा म्हणत दुधाची भरलेली केटली तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे सुपुर्द करुन विविध मागण्यांचे निवेदण देण्यात अाले.

यावेळी इंदापूर अर्बन बॅंकेचे चेअरमन भरतशेठ शहा, दुधगंगा संघाचे चेअरमन मंगेश पाटील, रयत क्रांतीचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, शहरध्यक्ष शकील सय्यद, गटनेते कैलास कदम, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे,  दुधगंगाचे उपाध्यक्ष उत्तम जाधव,  रा. स. प. चे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, अार. पी. अाय. चे पुणे जि. संघटक शिवाजीराव मखरे, अार. पी. अाय.चे तालुकाध्यक्ष संदीपानजी कडवळे, माऊली चवरे, गोपीचंद गलांडे व प्रकाश गायकवाड पदाधीकारी व शेतकरी उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

Previous articleकर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या?(कुंभिटोला येथिल घटना)
Next articleसाहेब,आमच्याकडे ऑनलाइन वर्गाठी साधन नाही जी ,आम्ही पाल्यांना कसे शिक्षण देणार?गोरगरीब वडिलांचा सवाल