कुरुड येथील आय डी बी आय बँकेचा मनमानी कारभार -पुरबाधित शेतकऱ्यांची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ -लोकप्रतिनिधी व प्रशासन गाढ झोपेत

0
121

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
दिवाळी होऊन व महापूर ओसरून बरेच दिवस झाले असून,पुरबधितांची रक्कम जमा होण्यास नावच घेत नाही व शेतकऱ्यांसाठी झटणारे कैवारीच आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण की,अजूनपावेतो पुरपिढीत शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेतच आहेत.
कुरुड येथील आय डी बी आय बँकेचे शाखा व्यवस्थापक पार्डीकर यांच्याशी प्रतिनिधीने विचारणा केली असता,सरळ स्टेट बँक ऑफ इंडिया जमा करेल आमच्याकडे काही नाही असे त्यांनी सांगितले.मात्र खरी परिस्थिती लक्षात घेता देसाईगंज तहसील कार्यालयातील कर्मचारी यांच्याशी चर्चा केल्या नन्तर त्यांच्या मते,दिवाळीच्या अगोदरच तालुक्यातील त्या -त्या बँकेच्या नावांनी चेक व पूरग्रस्त शेतकऱ्यांची यादी ही बँकांना दिली व बाकीच्या बँकांनी दिवाळी अगोदरच पुरबाधितांची रक्कमही जमा केली तसेच कुरुडच्या शाखा व्यवस्थापक यांनी पुरग्रस्तांची यादी तहसील कार्यालयाला परत पाठवली व सरळ आर टी जी एस मारा म्हणून सांगितले.
यावरून असे लक्षात येते की, कुरुड शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याच मनाचा कारभार चालवला असल्याचे दिसून येते.उलट त्यांनी अजूनपर्यंत तहसील येथील यादी न मागवता आपले याच्याशी काही देणे-घेणे नाही अशी भुमिका चालवली आहे.शेतकर्यांप्रति एवढा द्वेष कां असा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे.पुरग्रस्तांची रक्कम केव्हा जमा होणार हे देव जाणे.याकडे लोकप्रतिनिधी,बँकेचे वरिष्ठ अधिकारी व प्रशासन यांनी लक्ष घातले पाहिजे.