काँग्रेसचे अभिजित वंजारी हे भाजपा च्या नागपुर गडात विजयी; भाजपा चे संदीप जोशीं यांचा दारुण पराभव

0
419

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: ४ डिसेंबर २०२०
नुकत्याच झालेल्या नागपूर पदवीधर निवडणुकीची मतमोजणी कालपासून नागपुर च्या मानकापुर प्ले स्टेडियम मध्ये सुरु होती.आज पहाटेपर्यंत चाललेल्या पाचव्या राऊंडपर्यंत कांग्रेसचे अँड. अभिजीत वंजारी यांनी लीड घेत भाजपा चे उमेदवार नागपुर चे महापौर संदीप जोशी यांना धुळ चारली. आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापी, पहिल्या पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, नितेश कराळे ६ हजार८८९ मते मिळाली. विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला.

१७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर कांग्रेस चे अँड.अभिजीत वंजारी हे विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केल्यामुळे विजयी घोषित

१७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अँड. अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. १७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना ६१,७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२, ७९१ मते मिळाली. या निवडणुकीसाठी ६०,७४७ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता.
निर्वाचन अधिकारी यांचेतर्फे कांग्रेसचे अँड. अभिजीत वंजारी यांच्या विजयाची घोषणा होताच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना. सुनीलबाबु केदार, शिवसेना खा. क्रृपाल तुमाने कांग्रेस पक्षाचे नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्रभाऊ मुळक (माजी मंत्री), आ. विकासभाऊ ठाकरे, आ. राजुभाऊ पारवे, कांग्रेस नेते हुकुमचंद आमधरे, प्रसन्ना तिडके, विशाल मुत्तेमवार आदी आपल्या समर्थक नगरसेवक व कार्यकर्त्यांसह मानकापुर येथील मतमोजणी केंद्रावर पोहोचले आणि कांग्रेसचे विजयी उमेदवार अँड. अभिजीत वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र व मोठा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर कांग्रेसचे आ. विकास ठाकरे, नागपुर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक आणि विजयी उमेदवार अँड. अभिजीत वंजारी यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. कांग्रेसच्या नेत्यांनी विजयी उमेदवार अँड. अभिजीत वंजारी यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.