अरे बापरे…….आणि बिबट डुक्करला पकडतांना शिरला घरात !

अखेर बिबट 14 तासात झाला जेरबंद

0
680

 

हर्ष साखरे सहा जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

 

धानोरा:-
गावातील डुकराची शिकार करण्याचा प्रयत्न करताना बिबट घरात शिरल्याची घटना रांगी परीसरातील जाभंळी गावात बुधवारी 8:30 वाजताचे सुमारास घडली.तब्बल 14तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला येश आले.रांगी उपवनक्षेत्रा अतर्गत येत असलेल्या जाभंळी गावातील सुरेश धुर्वे यांच्या दारात असलेल्या झोपडीतील डुकरावर बुधवारी रात्री 8.30वाजताचे सुमारास बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला .त्या दरम्यान गावकर्‍यानी आरडाओरड केल्याने पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेला बिबट अचानक धुर्वे याचे घरात शिरताच सुरेश धुर्वे यांनी धाडस करुन स्वःताचे कुटुंबातील सदस्याना सुरक्षित बाहेर काढले. व घराचा दरवाजा बंद करुन बिबट्याला घरात कोबंले.
या बाबतची माहीती वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच गडचिरोलीचे उपवनरंक्षक डाँ.कुमारस्वामी,सहाय्यक वनसरंक्षक सोनल भडके,वनपरीक्षेत्राधिकारी चेतना मस्के,क्षेत्रसहाय्यक बलवंत येवले,वनरक्षक सचिन कोराम,ढोरे,जाभोर यांचेसह गडचिरोली,ब्रम्हपुरी,नागभिड येथिल रेसक्यू पथक रात्रीच गावात दाखल झाले व रात्रभर प्रयत्न केल्यानंतर दुसर्‍या दिवसी सकाळी गुरुवारला 10-30च्या सुमारास बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात यश मिळाले.