केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचा मंगरुळपीर रा. काॅ.कडुन तिव्र निषेध

0
98

 

फुलचंद भगत/मंगरूळपीर
केंद्रसरकारने शेतकर्‍यांना मारक ठरणारे कायदे पास केल्यामुळे मंगरुळपीर राष्टवादी काॅग्रेस पार्टिच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत हा शेतकरीविरोधी कायदा रद्द करन्याच्या मागणीचे निवेदन येथील तहसिलदार यांना दि.१४ डिसेंबर रोजी दिले आहे.
अगोदरच अंत्यत कठिण परिस्थीतीत जिवन जगणार्‍या शेतकर्‍यांना बळ देन्याची गरज असतांना त्यांना आणखी कमजोर करुन त्यांचे जीवन ऊध्वस्त करणारे तिन काळे कायदे केंद्र सरकारने पाशवी बहूमताच्या जोरावर जबरदस्तीने पारित करुन घेतले.या कायद्यामुळे शेतीवर जीवन जगणार्‍या शेतकरी,शेतमजुरांचे जीवन ऊध्वस्त होणार आहे.या केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी एकाधिकारशाहीचा मंगरुळपीर राष्टवादी काॅग्रेस पार्टीकडुन तिव्र निषेध केला असुन हा शेतकर्‍यांना घातक ठरणारा कायदा रद्द करुन सरकारने शेतकरी हिताचा कायदा करावा या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.या निवेदनावर राष्टवादी काॅग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योतीताई ठाकरे,लईक अहेमद,हरिदास गावंडे,जया बडवे,लक्ष्मीबाई,विजय बडवे,मधुकर पवार,सुभाष आमटे,दादाराव खडसे,सविता इंगोले,राजु येवले,गजानन सावके आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206