दशक्रियेनिमित्त स्मशानभूमीत स्वच्छता व वृक्षारोपण अनासाने परिवाराचा अनोखा उपक्रम

0
102

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

स्व.इंदिराबाई मनोहरसा अनासाने यांचे वृद्धापकाळाने
दि.२३ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांच्या दशक्रियेच्या दिवशी अनासाने परिवाराकडून सिरसोली येथील स्मशानभूमीत स्वच्छता व वड, पिंपळ, उंबर व इतर अनेक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हे खऱ्या प्रकारचे कार्य असल्याचे प्रतिपादन नातू सप्तखंजिरीवादक, युवाकिर्तनकार
ऋषिपाल महाराज अनासाने यांनी केले.

अशाप्रकारचा उपक्रम राबवून अनासाने परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सर्वांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी परिवारातील जेष्ठ श्री.नारायणराव अनासाने, शंकरराव अनासाने, पांडुरंगराव अनासाने, गजाननराव अनासाने,विजयराव अनासाने, संजयराव अनासाने, अशोकराव अनासाने, नंदकिशोरराव अनासाने, ज्ञानेश्वरराव अनासाने, दिलीपराव अनासाने, संतोषराव अनासाने हे भावंड तसेच गंगेश अनासाने , सागर अनासाने, ऋषिपाल अनासाने, तेजस अनासाने, सक्षम, विशाल श्रीतेश व समस्त अनासाने परिवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.