तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याला कोरोनाची बाधा……. अधुऱ्या रस्त्यामुळे पोहोरादेवी ला येजा करणाऱ्या वाटसरूंचे हाल

0
87

 

फुलचंद भगत/मंगरूळपीर
रस्ते इमारती व पुल विकासाचे पहिले पाहून या ब्रीद वाक्यला साजेसे अनेक राष्ट्रीय व राज्य महामार्ग तथा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळे विणण्याचे काम प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत धडाक्याने करण्यात येत असताना तालुक्यातील जगविख्यात तीर्थक्षेत्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता मागील अनेक महिन्यांपासून कोरोना महामारी च्या नावाने निधी रोखण्यात आल्याने प्रलंबित असल्याने दररोज असंख्य वाटसरूंना ये-जा करताना प्रचंड हाल सोसावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा ह्या राज्यातून तीर्थक्षेत्र पोहरादेवीला येण्यासाठी आणि अकोला,अमरावती या भागाकडून पंचाळा मार्गे, पोहरादेवीला येण्यासाठी वडगाव,आमकीनी,शेंदोना, पोहरादेवी,पंचाळा या मार्गाची निर्मिती मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत करण्यात येत आहे.
शेंदोना,आमकीनी, वडगाव पर्यंत हा रस्ता बांधण्यात आलेला असून वडगाव ते पोहरादेवी दरम्यान असलेल्या अपूर्ण रस्त्यावर मुरूम आणि उघड्यावर पडलेल्या गिट्टी मुळे मोठ्या प्रमाणात तीर्थ क्षेत्र पोहरादेवी ला ये-जा करणाऱ्या भाविक भक्त, प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठी कसरत मागील अनेक महिन्यांपासून करावी लागत आहे.

शेंदोना आणि पंचाळा फाटा येथून पोहरादेवी ला ये-जा करीत असताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. महाविकास आघाडी शासनाने तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या या अपूर्ण रस्त्याला प्राधान्यक्रमाने पूर्णत्वास नेऊन नागरिकांना दिलासा द्यावा.- प्रकाश जाधव सरपंच, बालाजीनगर (धावंडा)

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206