मंगरुळपीर काॅग्रेस कमेटीचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठींबा आणी समर्थनार्थ धरणे आंदोलन

0
79

 

फुलचंद भगत/मंगरुळपीर
केंद्र शासनाने पारित केलेल्या तिन कृषी विधेयक काळ्या कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर शेतकर्‍यांनी फार मोठे आंदोलन ऊभे केले तसेच महाराष्ट काॅग्रेस कमेटीतर्फे यापुर्वीही दोन कोटी स्वाक्षरी मोहिम,ट्रॅक्टर रॅली,रास्तारोको,धरणे आंदोलन आदी कार्यक्रम या कायद्याच्या विरोधात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर राबवलेले आहे.सध्या दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मंगरुळपीर काॅग्रेस कमेटीच्या वतीने जाहीर पाठींबा दिला असुन त्या समर्थनार्थ दि.४ डिसेंबर रोजी येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुनकेंद्र शासनाने पारीत केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा अशी मागणी करन्यात आली.या आंदोलनामध्येप्रकाश सावळे,दिलिप सरनाईक, प्रकाश इंगोले,वसंतराव बडवे,रमेश शिंदे,मिलिंद पाकधने,सलिम जहागीरदार,ऊबेद मिर्झा,सय्यद आझम यांचेसह पदाधिकार्‍यांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206