अडगाव खूर्द येथे शेतीचा रस्ता नागरल्या मूळे शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

0
121

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोटःतालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जानारा जुना मुंडगाव रस्ता रमेश महादेव धूळे व सुखदेव महादेवराव धूळे येथील यांनी हेतूपुरसपणे संपूर्ण शेतकऱ्यांचा रस्ता नांगरला आहे. त्या मूळे अडगाव खुर्द ते मुंडगाव रस्ता बंद पडला आहे शेतकरी कसेही दुसऱ्याचे धूऱ्यांकडून जावून शेती करतात पाण्या मध्ये गावातील शेतकरी आपली शेती पहातात या भागत गावातील शेतकऱ्यांची १५०एकर शेती आहे. दलीतांनची अंदाजे ५०एकर शेती आहे. दलीतांनी कसे शेत पाहाव हा प्रश्न पडला आहे.यामुळे वाद होण्याची शक्यता आहे रमेश धूळे हा विनाकारण त्रास देत आहे. आणि गावामध्ये अनेकरस्त्या बद्दल भांडने आहेत.तसे पोलीस स्टेशन ला तक्राररी सुध्दा आहेत भगवान गवाई यांच्या सोबत धुऱ्याबाद्दल,माजी सरपंच यांचे भाऊ रघुनाथ रंदे यांच्या सोबत वाद गावातील अनेक लोकांन सोबत वाद आहेत.त्यांचा मोठा भाऊ रिटायर मेजर असल्या मूळे धमक्या देते व रस्ता नागरत आहे. तरी विध्यमाण शेतकऱ्यांना न्याय देतील असे निवेदनात कडविले आहे. यावेळी जयराम देमाजी गवाई,गजानन गवाई,दादाराव गवाई, प्रकाश भड,रघुनाथ नेरकर,निरंजन गवाई,तेजराव गवाई आदी गवकरी उपस्थित होते.