कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या?(कुंभिटोला येथिल घटना)

कुरखेडा -राकेश चव्हाण प्र
नजीकच्या कुंभीटोला येथे स्वताचा शेतात असलेल्या कोरड्या विहिरीत एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून मृतकाने कर्ज व परीसरात कोरडा दूष्काळ सदृश्य परीस्थीती निर्माण होत असल्याने हताश होत आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे ही घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली
गिरिधर गोपाळा मुंगमोडे (५४ )असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार सोमवारी दीप अमावस्याच्या दिवशी घरच्या शेतात रोवनी करण्यासाठी आलेले हुंडेकरी महिला व पुरुष मजूर घरी निघून गेल्यावर मृतक गिरधर मुंगमोडे आपल्या शेतात एकटाच विहरिजवळ ठेवलेल्या सामानाची आवरा आवर करीत राहिला दरम्यान रात्रीचे आठ वाजले तरी वडील घरी परतले नाही म्हणून मुलगा प्रमोद शेजारच्या लोकांसोबत शोधाशोध करीत असताना शेतातील पाणी नसलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला सदर वार्ता गावांत पोहचताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व खाटेला दोर बांधून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला विशेष म्हणजे ३६ फूट खोली असलेली विहीर कोरडी आहे या विहिरीत बोर असून त्यालाही पाहीजे त्या प्रमाणात पाणी नसल्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी घेऊन कशीबशी धानाची रोवणी आटोपली होती
गिरीधर मुगमोडे गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सेवाभावी वृत्तीने काम करायचा सार्वजनिक हनुमान मंदिरामध्ये दरवर्षी स्वतः गावातील युवकांना घेवून काकड आरती करायचा त्याच्या आकस्मिक निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे मागच्या वर्षी जिवतीच्या आदल्या दिवशीच आईचे निधन झाले होते यावर्षी पावसाने दडी मारल्याने‌ पीक उत्पादनाचा भवितव्याबाबद तो चिंतीत व निराश होता तसेच त्याचावर काही खाजगी व बॅकेचा पुनर्गठित पिककर्ज होता या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत तो होता अशी माहिती प्राप्त झाली आहे त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत