घनसावंगी थाटले अवैध धंदे गुटका मटका दारू सर्रास चालू पोलीस प्रशासनाचा कानाडोळा

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात अवैध धंघ्यानी धुमाकूळ घातला असून शहरात मटका,गुटखा,दारू या तीन तिगाडानी धुमाकूळ घातला असून दररोज ची लाखो रुपयांची उलाढाल होत असून शहरातील तरुण पिढीवर याचा वाईट परीणाम होत असून देखील प्रशासन व स्थानिक अधिकारी कर्मचारी या अवैध धंदे विरोधात मूग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र दिसत आहे?फक्त जालना चे पथक येऊन धाडी टाकतात व जातात पुन्हा जैसे थे वैसे स्थिती घनसावंगी शहरात होत आहे.
शासनाने गुटका विक्रीकर बंदी घातली आहे तरी ही घनसावंगी तालुक्यात मात्र या आदेशाचे उल्लंघन होत आहे , घनसावंगी गुटक्याचे प्रत्येक पान टपरीवर गुटका आढळून येत आहे, अन्न व औषध अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरात विविध कंपनीच्या गुटख्याची जोरात विक्री चालू आहे या व्यवसायात दररोज घनसावंगी लाखोची उलाढाल होत आहे, विशेष म्हणजे शासनाची गुटका विक्री वर बंदी आहे ,तरी ही घनसावंगी काही गुटकाकिंग बिनधास्त पणे किरकोळ व्यावसायिकांना गुटका व दारू अवैद्य धंदे पुरवीत आहेत आणि ते , पानटपरीवर पाठवीत आहेत, गुटका हा शरीराला घातक आहे, त्या मुळे मौखिक रोग बळावत आहेत,तसेच यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचेही प्रमाण वाढले आहे .
याचा परिणाम युवा पिढी व्यसंधीनतेच्या आहारी जातांना दिसून येत आहे .
घनसावंगी गुटकाकींगाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळेच गुटख्याची खुले आम विक्री जोमाने सुरू असून ,या मागे प्रशासनाची भूमिका मात्र झोपेचे सोंग घेतल्यागत दिसून येत आहे.असेही जनतेतून बोलले जात आहे. घनसावंगी प्रत्येक पान टपरीवर गुटका घनसावंगी गुटका वो दारू अवैध धंदे देत आहेत आणि छोट्या एकाद्या पानपट्टीवर धाड टाकून मोठी कारवाई केल्याचा आव आणतात, परंतु संबंधित अधिकारी गुटकाकींगावर कारवाई करण्याचे अलीकडे टाळाटाळ का करीत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे,अवैध धंदे बंद करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांने करून सुद्धा , हे अवैध धंदे खुले आम जोमाने चालू आहेत. यामुळे घनसावंगी करांच्या चर्चेत हमखास अवैध धंद्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत? असा सवाल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तसेच घनसावंगी तालुक्यमध्ये पोलीस स्टेशन असताना सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे तालुक्यातील जनतेतून बोलले जात आहे. या भूमिकेमागे काय आशीर्वादारुपी हाता पैकी एक हात यांचा तर नाही ना? अशी सुद्धा चर्चा नागरिकांतून होतांना दिसून येत आहे. गुटका खाणे शरीराला घातक आहे, याचे दूरगामी परिणाम टाळण्यासाठी मुख्य गुटका विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश दादा देशमुख तालुक्याच्या नागरिकांतून केली जात आहे.
गुटखा,मटका,अवैध दारू या तीन तिगाडानी धुमाकूळ घागल्याने कार्यवाही करा मागणी युवा मोर्चा योगेश दादा देशमुख यांच्याकडून होत आहे व जनतेतून होत आहे.