जीवोदय फाऊंडेशन, पारशिवनी तर्फे करंभाड येथील नरेंद्र दुधकवडे या दिव्यांग मुलाला सायकल प्रदान करून जागतिक विकलांग दिन साजरा करण्यात आला.

 

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी(ता प्र):-जागतिक विकलांग दिनाच्या निमित्ताने जीवोदय फाऊंडेशन, पारशिवनी तर्फे करंभाड येथील नरेंद्र दुधकवडे या दिव्यांग मुलाला सायकल प्रदान करून *जागतिक विकलांग दिन* साजरा करण्यात आला. तसेच पंचायत सामिती रामटेक चे गट विकास अधिकारी मा. श्री.प्रदीप बमनोटे यांचे तर्फे आर्थिक मदतही देण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गोपाल कडू, नगरसेविका अनिता प्रमोद भड, सोनाली काकुनीया, खुशाल कापसे, अपंग एकात्मिक शिक्षणाच्या सारिका जाधव, चैताली खंगार, गौरीशंकर ढबाले, नीलू भुजाडे, ज्योती तांदुळकर, संतोष बोरकर, पालक रातिराम दुधकवडे उपस्थित होते.