भाजपाच्या अहेरी तालुका महामंत्री साईनाथ औतकर यांच्या कॉग्रेस व आविस मध्ये जाहीर प्रवेश

- जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून केली सत्कार

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी अहेरी

 

अहेरी:- अहेरी येतील भारतीय जनता पार्टीचे अहेरी तालुका महामंत्री साईनाथ औतकर, यांनी भाजपाला रामराम करून कॉँग्रेस व आदिवासी विध्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केले.
कॉग्रेसचे नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री,आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केले.
जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या अहेरी येतील जन सम्पर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आली.नवनिर्वाचित कार्यकर्त्याच्या जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,आविसचे सल्लागार अशोक येलमूले, आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार,अमोल अलोने,सुरेश दुर्गे,श्याम ओंडरे,मिलिंद अलोने,शिवराम पूल्लूरी,कार्तिक तोगम,दिपक संगमवार,प्रकाश दुर्गे,विपुल गर्गम,व काँग्रेस व आदिवासी विध्यार्थी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.