अहंकाराने उन्माद येता कामा नये;अन्यथा कार्यकर्ते जनतेतून उतरवतात, हा फडणवीसांना गडकरींनी लगावलेला टोला आज नागपुरात यशस्वी!

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर: ४ डिसेंबर २०२०
पुरोगामी महाराष्ट्रात कोरोना महामारी संकटाच्या सावलीत बॅलेट पेपरवर झालेल्या या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. या निवडणुकीतुन जनतेतून अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या की ईव्हीएम द्वारे भाजपा निवडणूक जिंकते पण बैलेट पेपर मुळे हरते. त्यामुळे आता होणाऱ्या पुढच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या बैलेट पेपर वर घेण्यासाठी कांग्रेस व अन्य सर्व विरोधी पक्षांनी भुमिका घ्याव्यात अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची निर्वाचन आयोगाला धमकी देत मोठे जनआंदोलन उभे करावे. महाविकास आघाडीच्या एक वर्षांच्या कारकीर्दीवर जनतेने विश्वास व शिक्कामोर्तब केले आहे. जनता महाविकास आघाडी व मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवून खुष आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
यात आश्चर्य झाले ते संघाचा गड असलेल्या नागपूर मध्ये, वर्तमान मा. केंद्रीय रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांनी प्रेमाने भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, अहंकाराने उन्माद वाढतो. एकदा अहंकाराने उन्माद वाढला की, कार्यकर्ते हे तुम्हाला जनतेतून खाली उतरवतात. आणि आज ते प्रत्यक्षात घडलेले नागपुरकरांनी बघितले. आपुलकीने जोपासलेला हा पदवीधर मतदारसंघ तसेच माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात खिंडार पडते. त्यांच्या अहंकारामुळे भाजपास पराजयास का बरे समोर जावे लागले?
मतदारांनी कधीही मनावर न घेतलेली निवडणूक म्हणजेच पदवीधर मतदारसंघाची, अश्या निवडणुकीत भाजप सारख्या प्रस्थापित राष्ट्रीय पक्षाचा उमेदवाराचा दारुण पराभव का व्हावा, हि अभ्यासाची बाब आहे. मतमोजणीच्या अगदी सुरुवातीपासून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून अँड. अभिजीत वंजारी हे पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नुकतीच वर्षपूर्ती होऊन ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती म्हणून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. लॉकडाऊन मुळे बरेच महिने राज्य बंद होते त्यात कोरोना संकटाशी यशस्वी पणे लढा दिल्याबद्दल महाविकास आघाडीला निवडणुकीत मतदाराने दिलेले यशाचे कौल म्हणजे नेमके काय सांगते? राज्यात विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.
मागील ४० वर्षापासून भाजपचा अभेद गड असलेला नागपुर पदवीधर मतदारसंघ, माहाविकास आघाडीने जिंकला. महाविकास आघाडीचे बेरजेच्या राजकारणाचे समीकरण यशस्वी ठरले. या निवडणुकीत महाविकास आघाडीने नागपुरात एक वेगळेच सामाजिक समीकरण जुळवले आणि त्यास यशस्वी केले मा. विधान सभा अध्यक्ष ना. नानाभाऊ पटोले, मा. पशु संवर्धन मंत्रीना. सुनीलबाबु केदार , मा. ऊर्जा मंत्रीडाँ. नितीन राऊत , मा. गृह मंत्री ना. अनिलबाबु देशमुख ,नागपुर जिल्हा कांग्रेस कमेटी चे लोकप्रिय अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र भाऊ मुळक, नागपुर जिल्हा ग्रामीण महिला कांग्रेस अध्यक्षा तक्षशिला वाघधरे, बाजार समितीचे संचालक हुकुमचंद आमधरे , कांग्रेस चे वरिष्ठ नेता सुरेशभाऊ भोयर, जि. प. व महानगरपालिका जनप्रतिनिधी, शिक्षक, बेरोजगार सुशिक्षित युवा, डॉक्टर, इंजिनियर, वकील, शेतकरी पुत्र, पराजित विधानसभा उमेदवार आणि स्वयं स्वावलंबित मतदार या सर्वांनी लक्षणीय एकतेने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला, आणि त्यात भर पडली सामाजिक माध्यमांमध्ये फिरत असलेले विविध पोस्ट, कोरोना काळात मनपा आयुक्त यांना त्रास देऊन त्यांची स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्ली येथून केलेली बदली, माजी मुख्यमंत्री यांनी घोषित केलेली आणि न भरलेली ७०००० ची मेगा भर्ती, अँड. सतिश ऊके यांनी भाजप उमेदवार संदीप जोशी यांच्यावर लावलेले गंभीर आरोप, केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला न मिळालेले जीएसटी ची रक्कम, दिल्लीतील शेतकऱ्यांचे असलेले आंदोलन, या सर्व बाबींचा संपूर्ण योग्य राजकीय फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाला आणि कधी नव्हे ती मराठी अस्मिता मतदारांमध्ये जागृत केली. महाविकास आघाडीचा तीन पायाच्या ऑटो रिक्षेला चौथे चाक जनता अशीच हातभार लावत राहिली तर पुढील ठाकलेल्या बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये दिलेले असेच महाधक्के दिसणे नवल ठरणार नाही कारण मतांचे गणित पाहता मतदारसंघात भाजपची मते मोठ्या प्रमाणात फुटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे आणि हे एकीचे बळ विरोधकांना भारी नक्कीच पडणार. हातातल्या जागा गमावल्या मुळे कदाचित पुढील दिवसांमध्ये अपयशाचे खापर एक मेकांच्या डोक्यावर फोडत खिश्यातले राजीनामे बाहेर यायला लागले तर नवल नाही. सेना भाजप युती अस्तिस्त्वात असती तर कदाचित आज हे चित्र वेगळेच असते.
अँड. अभिजीत वंजारी यांचे मिशन परिवर्तन आज खरोखरच सफल झाले.