किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे वणीत निदर्शने आंदोलन

 

वणी : परशुराम पोटे

केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी अध्यादेश रद्द करावा याकरीता देशभरातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत, त्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता स्थानिक किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने वणीत 3 डिसेम्बर ला दुपारी 1 वाजता शिवाजी चौकात निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वादग्रस्त शेती कायद्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत एकत्र आलेले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनंतर देशातील विविध राज्यांतील शेतकरी देखील आंदोलनाच्या समर्थनात रस्त्यावर उतरत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा कमेटी यवतमाळ व किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने येतील शिवाजी चौकात निदर्शने करून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे,सन 2020 वीज विधयक मागे घेण्यात यावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे दीडपट कृषी मालाला भाव मिळावा,सरसकट पीक कर्ज माफ करावे,सर्वंकष पीकविमा लागू करा, वीज बिल माफ करा,वनाधिकार कायद्याच्या जाचक अटी दूर करून केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या 6 सप्टेंबर 2012 आणि 11 नोव्हेंबर 2016 च्या महाराष्ट्र शासन परिपत्रकाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी व इतर पारंपरिक वनहक्क दावेदार शतकऱ्यांचे दावे पात्र करावे,परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शतकऱ्यांना दर हेकटरी 50 हजार रुपयांची मदत करावी इत्यादी मागणीचे निवेदन एसडीओ, तहसिलदार वणी यांचे मार्फत केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांना देण्यात आले.
यावेळी किसान सभेचे कॉ.शंकरराव दानव,अँड दिलीप परचाके, अँड विप्लव तेलतुम्बडे,नंदू बोबडे,वंचित बहुजन आघाडी चे मंगल तेलंग,मिलिंद पाटील,गौतम जीवने, किशोर मुन,दिलीप भोयर ,लढा शेतकरी हक्क चे रुद्रा कुचंनकर,संभाजी ब्रिगेड चे विवेक ठाकरे .डॉ. प्रशील बरडे,गीत घोष यांचे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.