गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे नक्षल दमन विरोधी सप्ताह

114

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज भारत

देवरी : गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे नक्षल दमन विरोधी सप्ताह निमीत्ताने पोलीस अधिक्षक श्री. मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले यांच्या उपस्थितीत दिनांक 20/07/2020 रोजी पो. स्टे. देवरी अंतर्गत ग्रामपंचायत शेरपार येथील मंगेझरी येथे सामाजीक उपक्रम व निशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोणा रोगाच्या प्रादुर्भावपासुन कसा बचाव करता येईल ,कशी काळजी घ्यावी ,तसेच नक्षलग्रस्त भागातील जनता व पोलिस यांचे संबंध कसे सुधारतील यावर भर देत, गावातील लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या. सदर शिबिरामध्ये पो.स्टे. देवरी ठाणेदार श्री अजीत कदम, सपोनी श्री कमलेश बच्छाव, डॉ. कुकडे तालुका वैद्यकिय अधिकारी देवरी, श्री नारायणजी ताराम तंमुगा. अध्यक्ष, श्री जर्नाधन कवास सरपंच शेरपार व प्राथमिक आरोग्य केंद्र फुटाना अंतर्गत उपकेंद्र शेरपार अंतर्गत डॉ. उमेश ताराम, तालुका वैद्यकिय रुग्णालय देवरी येथील डॉ. जगदिप रहांगडाले यांनी त्यांच्या टिमसह एकुण 122 नागरीकांची कोव्हीड-19 संबंधाने आरोग्य तपासणी केली. बी.पी. शुगर व शरीराचे तापमान चेक केले. तसेच गावातील 37 कुटुंबियांना राशन, मास्क व बिस्किट वाटप करण्यात आले. सौभाग्य योजना अंतर्गत गावातील एकुण 07 कुटुंबियांला मोफत विज कनेक्शन दिल्याची माहिती दिली.