शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल

0
78

 

कमलसिह यादव
पाराशीवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी(ता प्र):-पारशिवनी येथील जगेश सुबोध बोथरा याने २७ नोव्हेंबर रोजी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, कोविड १९ च्या नियमाचे पालन करून प्रत्येक नागरिकांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. तर व्यवसायीकांनासुद्धा मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. त्यावर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांचा शोध घेण्यासाठी नगर पंचायत कार्यरत शिपाई कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार मास्क न वापरणार्‍यांवर कार्यवाही करण्यासाठी फिरत असताना सोनार ओळीतील दुकानात आरोपी जगेश बोथरा, रा. सोनार ओळी हा मास्क परिधान न केल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याचा फोटो काढला असता त्याने नगर पंचायत कर्मचार्‍यांना शिविगाळ करून पाहून घेईल, अशी धमकी दिली. व व्हिडीओ क्लिप बनवून फेसबुक व व्हाट्सअपवर व्हायरल केली.
यावेळी नगर पंचायत कर्मचारी गीतेश जुनघरे, दत्ता गिलबिले, रोशन येरखेडे, ईश्‍वर येरखेडे, सागर बिसन, दिलीप दिघोरे, इशूलाल डहरवाल, धीरज निशाणे यांनी ही तक्रार पारशिवनी पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून प्रकरण तपासात घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व पाहून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, २९४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात पाठविण्याचे आदेश दिले. तपास पोलिस उपनिरीक्षक पळनाटे, जमाल मुधस्सर, रोशन काळे करीत आहे.