चांदुर बाजार येथे बिरसा क्रांती दल महिला शाखेचे गठन

 

सुरेंद्र तंतरपाळे प्रतिनिधी :
चांदुर बाजार येथे बिरसा क्रांती दल महिला शाखेचे गठन करण्यात आले . महिला शाखा गठन करण्या मागचा मुख्य उद्देश असा की मानसा प्रमाणेच त्याच्या बरोबरीने नुसते चुल आणि मूल यामध्येच त्यांचा संसार नसून मजुरी काम , रोडचे , कॅनलचे बरोबरीने पुरुषाप्रमाने काम करतात. यामधुनही त्यांनी आपल्या संसाराकडे लक्ष देऊन आपल्या मुलाना , मुलीला शिक्षणापासून वंचित ठेऊ नये शिक्षण हे वाघिनिचे दूध आहे ते घेउन गुरगुर करण्याची ताकद सुद्धा या आदिवासी समाज बांधवाना मिळायलाच हवी.याकरिता महिला सशक्तिकरण म्हणून चांदुर बाजार तालुका जिल्हा अमरावती येथे बिरसा क्रांती दल महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले . शाखेच्या अध्यक्षा सौ सविताताई जांभे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . शाखेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिति श्री .पवनसिंग तुमराम विभाग प्रमुख ,श्री.भिमराव मेश्राम अचलपुर तालुका अध्यक्ष ,श्री करण धुर्वे करजगाव शाखा अध्यक्ष उपस्थित होते.