स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे किल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

खेड : स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गेली सहा वर्षे किल्ले स्वच्छता अभियान आणि गड सवर्धन असे उपक्रम राबवत असते. यावर्षी या उपक्रमाबरोबर
स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे किल्ले प्रतिकृती स्पर्धा व रांगोळी स्पर्धा २०२० आयोजित केल्या होत्या.सदर स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे किल्ले स्पर्धा प्रथम क्रमांक – काळकाई इलेव्हन गुणदे तांबडवाडी,द्वितीय क्रमांक – हनुमान नगर,तृतीय क्रमांक – ज्ञानदीप मित्र मंडळ गणवाल आणि रांगोळी स्पर्धा-प्रथम क्रमांक -तन्वी कदम गुणदे सडावाडी,द्वितीय क्रमांक – स्नेहा आंब्रे गुणदे ढाकरवाडी,
तृतीय क्रमांक -कृपा आंब्रे गुणदे सडावाडी, तसेच किल्ले स्पर्धेत उत्तेजनार्थ अर्पण कारेते, रूद्र मोरे, सिध्देश कळंबटे, श्रीजय आंब्रे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रविण कळंबटे, शुभम कळंबटे, संतोष देवघरकर, अभिनित कळंबटे, सार्थक कळंबटे, सिध्देश चव्हाण,आदित्य कळंबटे, यश कळंबटे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन समीर आंब्रे, अक्षय मोरे व रोहित कळंबटे यांनी केले. सहभागी स्पर्धकांना भावी वाटचालीची शुभेच्छा देण्यात आल्या.

*दखल न्यूज भारत*