अहेरी इस्टेट चे राजे स्व.सत्यवानराव महाराज यांच्या जयंती निमित्य अहेरी येथे प्लाझ्मा (रक्त) दान शिबिराचे आयोजन. २० दात्यांनी केले प्लाझ्मा (रक्त) दान

 

रमेश बामनकर/ग्रामीण तालुका प्रतिनिधी अहेरी

दखल न्यूज नेटवर्क

अहेरी:- अहेरी इस्टेट चे दिवंगत राजे स्व. श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांच्या जयंती निमित्य विठ्ठल रखुमाई देवस्थान अहेरी येथे प्लाझ्मा दान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती तथा चिराग युथ फौऊंडेशन वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
सध्या कोविड-१९ च्या प्रादुर्भाव सुरु असल्याने ठिकठिकाणी कोरोना पाझिटिव्ह असलेल्या गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासत असते ती रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्लाझ्मा दान शिबिराच्या माध्यमातून त्यांची ही गरज पूर्ण करता येते.
अहेरी येथे झालेल्या या शिबिरात २० दात्यांनी प्लाझ्मा दान केले. स्थानीकांसह CRPF च्या जवानांनी सुध्दा प्लाज्मा दान शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराला माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे श्रीमंत अंबरीशराव महाराज यांनी भेट दिली आणि या उपक्रमाचे कौतुक केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती तथा चिराग युथ फौऊंडेशन वडसाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.