अनुभव शिक्षा केंद्रा वाशिम अंतर्गत शिवण (बु) येथे युवक मेळावा संपन्न

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:- आज दिनांक 03/12/2020 रोजी ग्राम शिवण (बु) येथे अनुभव शिक्षा केंद्र वाशिम आयोजित युवक मेळावा घेण्यात आला होता. या युवक मेळावा मध्ये युवकांची सामाजिक भूमिका या विषयावरती युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये युवकांची सामाजिक भूमिका वरती सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक लाभलेले मा.श्री. चंद्रशेखर डोईफोडे ( जि. प.सदस्य धनज) हे होते तर प्रमुख पाहुणे मा. श्री. निखील धोंगडे (सामाजिक कार्यकर्ते) प्रमुख उपस्थिती मा.श्री.विशाल ठाकरे(सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री.किरण तुपाडे (सामाजिक कार्यकर्ते) आणि तसेच मा. श्री. आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र वाशिम जिल्हा समन्वयक) हे मान्यवर या युवक मेळावा मध्ये उपस्थित होते.या युवक मेळावा मध्ये गावातील मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी चंद्रशेखरजी डोईफोडे, जिल्हा परिषद सदस्य) पुढे बोलताना म्हणाले की युवकांनी आपला देशाची धूरा खांद्यावरती घेऊन समता, बंधुता ,न्याय, हक्क, या संविधानातील मूलभूत तत्त्वांची अर्थ समजून घेऊन अंगी बाळगावा छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए.पी.जे अब्दुल कलाम ,सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाच्या हितरक्षणासाठी आपले प्राण ज्योत मावळे यांचा आदर्श मनामध्ये ठेवून देशाच्या हितरक्षणासाठी आपले समोरील पाऊल उचलले पाहिजे. असा प्रेरणादायी संदेश कार्यक्रम प्रसंगी उपस्थित युवकांना दिला.या युवक मेळावा सूत्रसंचालन हरीश मुसळे व आभार गौरव ढोरे यांनी मानले आणि या युवक मेळावा ला तरुण युवक व गावातील नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश होता. सदर कार्यक्रम हा शिवन (बु) येथे घेण्यात झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित गावातील नागरिक ,तरुण युवक आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत