नागपुरात कांग्रेस चे अँड. अभिजीत वंजारी यांची महाविजयाच्या दिशेने वाटचाल; भाजपाचा गड कोसळला

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : ३ डिसेंबर २०२०
मागील ४० वर्षापासून भाजपा चा गड असलेला नागपुर मतदारसंघ सध्या कांग्रेस च्या अँड. अभिजीत वंजारी यांनी नेस्तनाबूत केला असल्याचे चित्र दिसत आहे.
पहिल्यांदा च भाजपा मध्ये दोन गट पडलेले दिसले. भाजपा च्या अभेद्य गडाला भोक कोणी पाडले अशी चर्चा सुरू झाली. गडकरी गटाचे अनिल सोले यांना तिकीट ना देता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गटाचे संदीप जोशी यांना तिकीट दिल्याने नाराज गडकरी गटाने फडणवीस गटाची पुर्ती वाट लावल्याचे दिसुन येते. नितीन गडकरी यांचा फोटो बैनरवरुन गायब झाल्याने क्षुब्ध गडकरी गटाने भाजपाचे संदीप जोशी यांची पुर्ती वाट लावली.
आज मानकापुर येथील स्टेडियम मध्ये झालेल्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरी अखेर कांग्रेसचे अँड. अभिजीत वंजारी यांनी ३५५०९ मते घेत भाजपा चे संदीप जोशी यांना जोरदार धक्का दिला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संदीप जोशी यांना ३५८९८ मते पडली. त्यामुळे भाजपा चा नागपुर विभागात दारुण पराभव होत असल्याचे दिसून येत आहे.

*पहिल्यांदा च कुणबी+तेली+एस सी+मुस्लिम मतदार एकत्र येत RSS BJP चा गड उद्ध्वस्त केला*
मागील ४० वर्षात पहिल्यांदा च तेली कुणबी एस सी मुस्लिम एकत्र येत प्रस्थापित भाजप आरएसएस च्या गडाला एकत्र येत अहंकार नष्ट केला. हा आमचा गड आहे आम्हाला कोणी हरवु शकत नाही अशा अविर्भावात असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा नागपुरात दारुण पराभव होणे हा मात्र चिंतेचा विषय आहे. ४०वर्षातील भाजपा चा हा गड राखण्यासाठी संदीप जोशी का फेल झाले? याचा विचार केला तर असे दिसुन आले की संदीप जोशी यांनी कोरोना काळात मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची स्वतःच्या स्वार्थासाठी बदली केली हाच मुद्दा जनते पर्यंत आणि खासकरून पदवीधर मतदारांना आवडला नाही. त्यामुळे संदीप जोशी यांना यावेळी त्यांची जागा दाखवून देऊच या भुमिकेतुन मतदारांनी आम्ही तुकाराम मुंडे सोबत आहोत आम्हाला अहंकारी संदीप जोशी नकोच ही भुमिका घेतली आणि त्यामुळे आज भाजपाचे संदीप जोशी हे मोठ्या पराभवाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.