उपसभापती हरिश्चंद्र मेश्राम यांच्या हस्ते धान खरेदी केंन्द्र कोटरा चा शुभारंभ

0
79

 

ऋषी सहारे
संपादक

आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत कोटरा येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन उपसभापती हरिश्चंद्र मेश्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे रामचंद्र मेश्राम,संचालक ,मनकुजी कल्लो, वासुदेव मुगणकर, काशिराम उईके,संतु नरोटे, रूपचंद देशमुख, व्यवस्थापक जे.एच.उईके ,केंद्र प्रमुख,आर.पी.मडावी, उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे गुरूवार ३ डिसेंबर रोजी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपसभापती हरिश्चंद्र मेश्राम यांनी कोटरा येथे धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.
यावेळी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चे व्यवस्थापक जे.एच.उईके यांनी, शासनाने हमीभाव अ दर्जाच्या धानाला 1888/- व क दर्जाच्या धानाला 1868/-भाव असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन उईक यांनी यावेळी केले.
धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे संचालक,व गावकरी वर्ग उपस्थित होते.