अन्नदात्यावर उपासमारीची व आत्महत्येची पाळी. ग्रामसभेची मागणी मंजूर करा.

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची
शेतकरी हा अन्नदाता असून तो देशातील जनतेचे पोट भरण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतो पण नैसर्गिक आपत्तीमुळे कधीकधी त्यांच्यावरच उपासमारीची व आत्महत्या करण्याची पाळी येते. कोरची तालुक्यात यावर्षी प्रचंड दुष्काळ पडला आहे. एक तर उशिरा पाऊस पडल्यामुळे लोकांची पेरणी उशिरा झाली आणि त्यातल्या त्यात पावसाने नंतर दडी मारल्यामुळे दरवर्षी च्या सरासरी फक्त 30 ते 40 टक्केच उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात आले. त्यामुळे कोरची तालुक्यातील शेतकरी बांधव खालील बाबींसाठी निवेदन करत आहेत. आपण राज्याचे प्रमुख म्हणून विशेष लक्ष करून मागणीची पूर्तता कराल ही अपेक्षा ठेवून निवेदन सादर.
कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे
1) अनियमित पावसामुळे कोरची तालुक्यात 30 ते 40 टक्के उत्पन्न आल्यामुळे दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकर्‍यांना कोरची तालुका दुष्काळ घोषित करून हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत घ्यावे.
2) दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत काढलेल्या विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी.
3) दुष्काळग्रस्त कोरची तालुक्यातील चालू हंगामाचे पिक कर्ज माफ करण्यात यावे.
4) प्रत्येक कुटुंबाला काम मिळावे यासाठी मनरेगा योजनेची कामे लवकरात लवकर सुरू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
5) रोजगार हमी कामाचे व सर्व योजनेचे व्यवहार बँक मार्फत होत असतात आणि कोरची तालुक्यात फक्त एक राष्ट्रीयीकृत बँक व एक कॉपरेटिव बँक आणि एक ग्रामीण बँक आहे त्यामुळे बँकांचे आर्थिक व्यवहार करताना कोरची परिसरातून 40 ते 50 किलोमीटर अंतरावरुन येणाऱ्या लाभार्थ्यांना अडचणी येतात म्हणून जवळच्या ठिकाणी मसेली कोटगुल कोटला या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मंजूर करावे.
6) कोरची येथील बँक ऑफ इंडिया इमारतीच्या अपुऱ्या जागेमुळे व गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व ग्राहकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी बँक ऑफ इंडियाची शाखा कोरची मध्ये स्थलांतरित करण्यात यावी.
7) कोरची येथील राष्ट्रीयीकृत बँकेकडे फक्त सत्तावीस गावांचे कामे केली जातात उर्वरित गावाच्या बँक व्यवहारासाठी भारतीय स्टेट बँकेची शाखा तात्काळ मंजूर करण्यात यावी.
8) कोरची मधील गावाकडे अध्यात्म महसुली गाव घोषित झाले नाहीत त्यांना वन हक्क कायद्यांतर्गत महसुली गावांचा दर्जा देण्यात यावा.
9) 13 डिसेंबर 2005 च्या अगोदर अतिक्रमण धारकांना वनहक्क कायद्याअंतर्गत तातडीने अधिकार पत्र देऊन सिंचनाची सोय करून द्यावे.
10) कोटगुल येथील मंजूर असलेले 33 kv विद्युत सब सेंटरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.
11) कोरची तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे.
वरील मागण्या 27 डिसेंबर 2020 पर्यंत मंजूर न झाल्यास शेतकरी शेतमजुरांचा व ग्रामसभांचा विशाल धडक मोर्चा तहसील कार्यालयावर 28 डिसेंबर 2020 ला काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.