शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बसेस ची व्यवस्था करा – जिल्हाध्यक्ष हंसराज बडोले

 

अश्विन बोदेले
ता प्र आरमोरी

महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 11 2020 पासून वर्ग नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत शाळा सुरू केले परंतु वस्तीगृह अजूनपर्यंत सुरू केले नाही त्यामुळे वस्तीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे दुसरी बाब म्हणजे ग्रामीण भागात विज्ञान शाखेची सोय नसल्यामुळे व ग्रामीण भागात अजून पर्यंत बसेसची सोय नसल्यामुळे ते शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येऊ शकत नाही आले तर त्यांच्याकडे पासेस नसल्याने तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतात व त्यामुळे त्यांचे अधिकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो अहिल्याबाई होळकर व मानव विकास मिशनच्या बसेस ज्या मुलींसाठी आहेत त्या सुरू करण्यात याव्या आरमोरी बस स्थानकात कर्मचाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे पासेश चे काम इथूनच करता येतील ऑनलाईन शिक्षण देणे सुरू आहे परंतु ग्रामीण भागात नेटवर्क उपलब्ध नसल्याने व काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत अशा परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी समाज कल्याण विभाग परिवहन विभाग शिक्षण विभाग व माननीय जिल्हाधिकारी तसेच मुख्याध्यापक संघाने जातीने लक्ष घालून तात्काळ वसतिगृह बसेस सुरू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊन नुकसान होणार नाही असे आवाहन हंसराज बडोले जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ यांनी केले आहे.