मोकाट जनावरांमुळे उभ्या पिकांचे झाले नुकसान

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची
शहरात नेहमी मोकाट जनावरांचा वावर बघितला जात असून या जनावरांमुळे शहरातील जनतेला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कित्येक दुचाकीस्वार या जनावरांमुळे जखमी झाले आहेत. गाई-बैल हे दिवस-रात्र शहरातील मुख्य चौकात व रस्त्यात वावरत असल्यामुळे चौकात खेळणाऱ्या लहान मुलांनासुद्धा याचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरची येथील उषा टेंभुर्णे या शेतकऱ्यांनी धान्याची लागवड केली. चार महिने या शेतावर राब राब राबून धान्याची फसल काढली. मागच्यावर्षी पेक्षा उत्पन्नही पहिलेच कमी. परंतु धान्याची कापणी करून दोन पैसे जमा करावेत अशा उद्देशाने सदर शेतकरी पहिलेच चिंतेत दिसत होते व दोन दिवसांनी आपल्या पिकाची कापणी करून धान्याची मिंजायी करू असे विचार मनात धरून त्यांनी शेताकडे जाऊन पाहणी केली. परंतु शेतात जाऊन पाहणी केल्यास पायाखालची जमीनच सरकल्याकस झाली. कारण पाउन एकर शेतामध्ये लावलेले धान्य हे पूर्णपणे गाई-बैलांची चरून काढले होते. ज्यामुळे अंदाजे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शामलाल मडावी व काँग्रेसचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल यांनी शेतावर भेट देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले व नगरपंचायतचा मोकाट जनावरांकडे होत असलेला दुर्लक्ष याकडे लक्ष देण्याची मागणी केली. कोरोना सारख्या महामारीच्या काळात शेतकर्‍यांचे असे नुकसान होणे खूप गांभीर्याची बाब असून असे नुकसान अजून कुठल्याही शेतकर्याचे होता कामा नये म्हणून नगरपंचायतीने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शामलाल मडावी व मनोज अग्रवाल यांनी केले आहे.