सावली तालुका काँग्रेसचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा = शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

सुधाकर दुधे
सावली – केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी अध्यादेश रद्द करावा याकरीता देशभरातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता सावली तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वादग्रस्त शेती कायद्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत एकत्र आलेले आहेत. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनंतर देशातील विविध राज्यांतील शेतकरीदेखील आंदोलनाच्या समर्थनात रस्त्यावर उतरत दिसत आहेत. या आंदोलनास राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठिंबा दर्शवून आंदोलन सुरू केले आहे. याच धर्तीवर सावली तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून देशाचे पंतप्रधान यांना शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार सागर कांबळी यांचे मार्फत देण्यात आले. यावेळी तालुका काँगेसचे अध्यक्ष यशवन्त बोरकुटे, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, बाजार समितीचे सभापती हिवराज शेरकी, जिल्हा परिषद सदस्या वैशाली शेरकी, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, माजी सभापती मोतीलाल दुधे, दीपक जवादे, नरेंद्र तांगडे, भोगेश्वर मोहूर्ले, अनिल मशाखेत्री, केशव भरडकर, मनोज तरारे, निखिल सुरमवार, अतुल येलट्टीवार, भास्कर आकारपवार, दामोदर आगरे उपस्थित होते.