भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या 6 छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार 

 

 

निरा नरशिंहपुर :दि -3 प्रतिनिधी :बाळासाहेब सुतार, 

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या 6 विद्यार्थ्यांचा भारतीय सैनिक दलात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे गुरुवारी (दि.3) सत्कार करण्यात आला.

एन.सी.सी. कॅडेट रोहित वजाळे, अजय गाजरे, ऋषिकेश शेंडगे, प्रीतम काळे, संजय वाघमोडे, शेखर खाडे हे सहा विद्यार्थी नोव्हेंबर २०२० मध्ये सैन्यदलात भरती झाले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी भरती झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. इंदापूर तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून भारतीय सैनिक दलात भरती होण्यासाठी या युवकांनी घेतलेला निर्णय, त्यांचे परिश्रम याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो,  असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

यावेळी संस्थेचे संचालक तुकाराम जाधव, प्राचार्य डॉ.संजय चाकणे, एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे उपस्थित होते.

_______________________________

फोटो:-इंदापूर येथे भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या छात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160