केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलन दडपशाही च्या विरोधात सावलीयेथे तीव्र निदर्शने….

 

सावली (सुधाकर दुधे )

– शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले तीन कायदे रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या वतीने 26 नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली येथे बेमुदत विशाल ठिय्या आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार सदर आंदोलन चिडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु शेतकरी शांततेच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवला आहे आणि जो पर्यंत केंद्र सरकार शेतकरी विरोधातील पारित केलेले कायदे रद्द करत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीने घेतली आहे. म्हणून दिल्ली येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सावली येथे 3 डिसेंबर 2020 रोजी तीव्र निदर्शने करून सरकार विरोधात नारेबाजी केली व त्यानंतर शेतकरी व सावली तालुका कांग्रेस च्या वतीने तहसिलदार मार्फत मा.प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवून शेतकरी विरोधात पारित केलेले कायदे रद्द करण्याची मागणी केलीआहे.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करताना सावली तालुका कांग्रेस अध्यक्ष बंडु बोरकुटे. सभापती विजय कोरेवार.वैशाली शेरकी. हिवराज शेरकी. विजय मुत्यलवार भोगेश्वर मोहुर्ले. अनिल मशाखेत्री. नरेंद्र तांगडे निखिल सुरमवार . मोतीलाल दुधे. मनोज तरारे. केशव भरडकर. आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते