वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार

ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

 

हर्ष साखरे सहा जिल्हा प्रतिनिधी

ब्रम्हपूरी:- ब्रम्हपूरी तालुक्यातील दक्षिण परिक्षेत्रातील जंगलव्याप्त भागातील चिचगाव (डोर्ली) गावातील एका महिलेला दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. ब्रम्हपूरी तालुक्यातील नेहमीच वन्यजीव प्राणी व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यापुर्वी अनेक आंदोलनं करण्यात आले. पण वनविभागने अजुनही कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.

आज ठार झालेल्या महिलेचे नाव ताराबाई खरकाटे वय ५५ असे असुन नेहमी प्रमाणे सकाळी गावाबाहेर शेन फेकण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला व नरडीचा घोट घेऊन जागीच ठार केले. व काही अंतरावर झुडपामध्ये नेले सदर घटने मुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहोचले व ब्रम्हपूरी पोलिसांना सुचना देण्यात आले. मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.पुढील तपास ब्रम्हपूरी पोलिस करीत आहे‌.