केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलन दडपशाही च्या विरोधात आरमोरी येथे तीव्र निदर्शने….

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आरमोरी :- शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले तीन कायदे रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या वतीने 26 नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली येथे बेमुदत विशाल ठिय्या आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार सदर आंदोलन चिडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु शेतकरी शांततेच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवला आहे आणि जो पर्यंत केंद्र सरकार शेतकरी विरोधातील पारित केलेले कायदे रद्द करत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. अशी भूमिका अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीने घेतली आहे. म्हणून दिल्ली येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आरमोरी येथे 3 डिसेंबर 2020 रोजी किसान समन्वय समिती च्या वतीने जुन्या बसस्टँड जवळ तीव्र निदर्शने करून सरकार विरोधात नारेबाजी केली व त्या नंतर तहसिलदार मार्फत मा.राष्ट्रपती यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधात पारित केलेले कायदे रद्द करण्याची मागणी केलीआहे.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करतांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदक्ष कॉ. डॉ महेश कोपुलवार, जिल्हा सहसचिव तथा नगरसेवक अँड जगदीश मेश्राम, किसान सभेचे नेते कॉ.विनोद झोडगे, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज वनमाळी, सेवादल प्रमुख राजू गारोदे, माझी पंचायत समिती सभापती अशोक वाकडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, शिवसेना तालुकप्रमुख महेंद्र शेंडे, विजय मुर्वतकर, नगर सेवक शिंधू कापकर, नगर सेवक दुर्गा लोणारे, नगर सेवक निर्मला किरमे, काँगेस शहर अध्यक्ष शालिक पत्रे, भारतीय महिला फेडरेशन अध्यक्ष कॉ.मीनाक्षी सेलोकर, भाकप शहर प्रमुख कॉ संजय वाकडे, कॉ.प्रकाश खोब्रागडे, सुरेश फुकटे, अमोल दामले, मनोज दामले, महेश मेश्राम, सुरेश सोनटक्के, भोपाल घुटके, रोशनी बैश, नामदेव सोरते, श्रीकांत वैद्य आदी कार्यकर्ते उपस्थित होते.