अकोला जिल्हा वाहतूक शाखेचा अकोट शहरात कारवाईचा धडाका, ८५ वाहनांवर कारवाई

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ ह्यांनी कर्मचार्यांसह अचानक अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या रोडवर कारवाई सुरू केल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकात एकच खळबळ उडून बऱ्याच वेळ अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या अकोट ते हिवरखेड, अकोट ते दर्यापूर व अकोट ते अंजनगाव ह्या रोडवर शांतता पसरली होती.सदर मोहिमेवर पोलीस निरीक्षक गजानन शेळके स्वतः लक्ष ठेवून होते सदर कारवाई मध्ये क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणारी एकूण १७ वाहने ,हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या ३८ व इतर ३० अश्या एकूण ८५ वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली, ज्या प्रवासी वाहन चालकां कडे वैध कागदपत्रे नव्हती अशी वाहने पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आली आहे.