अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बाजार पेठेतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर!

 

प्रतिनिधी : मिथुन वैद्य-अलिबाग रेवदंडा)

अलिबाग : तालुक्यातील रेवदंडा बाजार  पेठ ही परिसरातील  एक मोठी बाजार पेठ म्हणुन ओळखली जाते, छोट्या छोट्या दुकानान पासून मोठ्या मोठ्या मॉल पर्यत रेवदंडा बाजार पेठ सजली असून
बाजार पेठेत ग्राहकाची मोठी वर्दळ असते,
मात्र दिवसेंदिवस रेवदंडा बाजार पेठेत समस्या भेडसावते वाहतूक कोंडीची दिवसागणिक रेवदंडा बाजार पेठेत वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहने त्यात अरुंद मार्ग परिणामी रेवदंडयात वाहतूक कोंडी होता ना दिसतं आहे.त्यात भरीसभर रस्त्यावरील खंड्याचे साम्राज्य ही प्रामुख्याने समस्या असल्याने वाहनाचा वेग मंदावतो परिणामी वाहतूक कोंडीची समस्या रेवदंडा बाजार पेठेत भेडसावत असून, खरेदी करता आलेल्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करवा लागत असून, ग्राहक व विक्रेत्यान कडून वाहतूक कोंडीबाबत नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.

*दखल न्यूज भारत*