सभापती हिरालाल सयाम यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

 

ऋषी सहारे
संपादक

आदिवासी विकास महामंडळ, उप-प्रादेशिक कार्यालय कोरची अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्राचे उदघाटन सभापती हिरालाल सयाम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सोबत आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक डि.एस चौधरी, विपणन निरीक्षक दिनेश बोरकुटे, उपसभापती कैलास गुरुपंचा, व्यवस्थापक डि.बी.जांभुळकर उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे या हंगामातील धान मळणीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून या हंगामाच्या धान खरेदी केंद्राचे बुधवार 2 डिसेंबर रोजी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सभापती हिरालाल सयाम यांनी मसेली येथे धान खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.
यावेळी उपप्रादेशिक व्यवस्थापक डि.एम.चौधरी यांनी, शासनाने हमीभाव अ दर्जाच्या धानाला 1888/- व क दर्जाच्या धानाला 1868/-भाव असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गोदामात आणून धानाची विक्री करावी कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे असे आवाहन चौधरी यांनी यावेळी केले.
धान खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आदिवासी विविध सहकारी संस्थेचे संचालक,व गावकरी वर्ग उपस्थित होते.