यावेळी झालेले बंपर मतदान कोणाला विजयी ठरवणार? भाजप चे संदीप जोशी यांना तारणार की पाडणार?

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
संपादक दखल न्युज भारत

नागपुर : ३ डिसेंबर २०२०
नागपुर पदवीधर मतदारसंघातील मागच्या निवडणुकीत ३७ % मतदान झाले होते. यावेळी कोरोना संकटात ही नागपुर विभागात पदवीधर व शिक्षकांत कमालीचा उत्साह दिसून आला. यावर्षी मागच्या निवडणुकीतील मतदानाचा रेकार्ड मोडून पदवीधर व शिक्षकांनी उत्साहाने पुढे येत मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. यावेळी झालेले ६४% चे बंपर वोटिंग भाजपाचे संदीप जोशी यांना तारणार की कांग्रेस चे अभिजीत वंजारी यांना जिंकविणार, असा प्रश्न राजकीय गोटात चर्चेत आहे.

*मतदानात शिक्षक आघाडीवर*
नागपुर पदवीधर मतदारसंघात प्रत्येक पदवीधरांना मतदानाचा अधिकार आहे. पण यांत शिक्षक पदवीधरांचा रोल महत्वपूर्ण आहे. मतदानाच्या टक्केवारीत शिक्षकांचे यावेळी प्रमाण हे ९०% हुन अधिक आहे. त्यामुळे हे शिक्षक ज्या उमेदवारांच्या मागे राहतील त्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. पदवीधरांची नोंदणी करण्याचे कार्य राजकीय पक्षांचे शिक्षक सेल आघाडीवर होते. प्रत्येक शाळा काँलेज मध्ये शिक्षकांमार्फत उमेदवारांचा प्रचार आघाडीवर होता. मतदार नोंदणीपासुन तर मतदारांना घराबाहेर काढण्यात शिक्षक च आघाडीवर दिसले. त्यामुळे नागपुर पदवीधर मतदारसंघात शिक्षकांचे झालेले बंपर वोटिंग भाजपा चे संदीप जोशी यांना घातक म्हटले जात आहे. शैक्षणिक संस्था चे संचालक अँड. अभिजीत वंजारी यांच्या विजयासाठी कुणबी तेली एकत्र आलेले पहिल्यांदाच चित्र बघायला मिळाले. वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राहुल वानखेडे हे यांच्याकरिता वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीतील सर्व अधिकारी, कर्मचारी पदवीधर यांना एकत्र येऊन निवडणुकीत आंबेडकरी चळवळीच्या विजयाचे आवाहन केले होते. त्यामुळे जवळपास दीड लाख एस सी बौद्ध पदवीधर जे सुज्ञ व सुशिक्षित मतदार आहेत, हे परिवर्तनाच्या दिशेने ही वाटचाल करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. एस सी समाजातील अन्य उमेदवार प्रा. विनोद निकोसे यांचे त्यांच्या च काँलेज चे संचालक सचीव अँड. अभिजीत वंजारी यांच्या विरोधात पुकारलेले बंड हे सुद्धा चर्चेला आले. बिएसपी ने गोंधळ घातला यावेळी. बिएसपी चे अतुल खोब्रागडे हे निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिले तर ऐनवेळी डेकाटे यांना बिएसपी ने समर्थन देऊन गोंधळ उडवला. अँड. सुनिता पाटील ह्या एकमेव महिला उमेदवार आहेत ज्यांना अंशकालीन पदवीधर कर्मचारी संघठना तसेच राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी चे समर्थन होते.. त्यामुळे एस सी समाजाचे वोट कुठे गेले हा अंदाज अजुनही ठरवता आला नाही.
तर आम माणसांचा कर्हाळे मास्तर (शिक्षक) जे सोशल मीडिया तुन आघाडीवर होते. सर्वसामान्य शिक्षक ही राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार यांच्या मागे ना राहता कर्हाळे मास्तर करिता अंदरुन मदत करतांना दिसले. विदर्भ वादी संघटना ह्या वेगळा विदर्भ व पदवीधर मतदारांचा प्रश्न घेऊन नितीन रोंघे यांच्या विजयासाठी प्रयत्नशील दिसल्या.
आज मानकापुर नागपूर येथील क्रीडा स्टेडियम येथे मतमोजणी ला सुरुवात सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली आहे. आणि सायंकाळपर्यंत निकालाची अपेक्षा आहे. यावेळी झालेले बंपर मतदान कोणाला तारणार आणि कोणाला जिंकविणार हे आता मतपेटीतील मतदान ठरवणार आहे. पण हे मात्र नक्की की, यावेळी नागपुर पदवीधर मतदारसंघात परिवर्तन घडणार!