चामोर्शी येथे शिक्षणाधिकारी यांची कोविड आढावा सभा..

तालुका प्रतिनिधी
आरमोरी

जि.प. शिक्षक पत संस्था सभागृह, चामोर्शी येथे शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री आर.पी.निकम यांनी चामोर्शी तालूक्यातील सर्व मुख्याध्यापकांची नुकतीच सभा घेतली. सभेला गटशिक्षणाधिकारी श्री चंद्रकांत मस्के, केंद्र प्रमुख श्री हिम्मतराव आभारे, गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ. संजय भांडारकर, चामोर्शी तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री महेश तुमपल्लीवार, प्राथमिक आरोग्य केंद्र, आमगाव चे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैरागडे तथा चामोर्शी तालूक्यातील 39 मुख्याध्यापक कोविड नियमांचे पालन करून, सोशल डिस्टंस ठेवून उपस्थित होते.
सभेत पुढील मुद्यांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली-
दि. 10-11-2020 च्या परिपत्रकाचे वाचन करून समजून घ्यावे.
सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांची कोविड टेस्ट करणे अनिवार्य आहे.
स्थानिक परिस्थिती योग्य असल्यास विद्यार्थी उपस्थिती वाढवावी.
शाळा सैनिटाईज करणे, शाळेत सैनिटायजर, थर्मल टेंपरेचर गन व पल्स ऑक्सीमिटर चा वापर करून नियमित तपासणी करून लक्षणे आढळल्यास किंवा कोविड असण्याची शंका आल्यास नोंदी ठेवाव्यात व आवश्यकता वाटल्यास नजिकच्या आरोग्य अधिकार्यांना कळवावे.
सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नियमित मास्क वापरावेत.
शाळेत कर्मचार्यांचे आपातकालीन गट व स्वच्छता- सर्वेक्षण गट तयार करावेत.
NMMS, शिष्यवृत्ती, नवोदय, इ. परीक्षांना पात्र जास्तीत जास्त विद्यार्थी बसवावे.
100 टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावेत. आधारमध्ये त्रृट्या असल्यास तालूका पोस्ट ऑफीसच्या आधार केंद्रात दुरूस्ती करण्यास सांगावे.
ऑनलाईन स्वाध्याय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करण्यास लावावे.
कोविड-19 पॉझीटीव कर्मचार्यांची वैद्यकिय अर्जित रजा लावण्यात यावी.
मानव विकास मिशनच्या बस करिता आगार प्रमुखांना गाव, मार्ग, बसने ये-जा करणार्या विद्यार्थ्यांची यादी/ संख्या, शाळेची वेळ (शक्यतो एकाच पाळीत – 11 ते 2 व शनिवारी 8 ते 11), इ. माहीती तात्काळ द्यावी.
वर्गनिहाय पालक सभा घ्याव्यात.
शालेय पोशन आहार वाटप करावे.
वेतन देयकासोबत RTE प्रमाणपत्र, खाता मान्यता, संच मान्यता (प्रस्ताव दाखल असल्यास O/c) वर्षातून एकदाच द्यावे
इत्यादी विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन सचिव श्री प्रकाश पालांदुरकर यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव श्री अशोक वाकुडकर यांनी केले.