“” कोरोना योद्धा सफाई कामगार यांचा बामसेफ सिंदेवाहीतर्फे सत्कार ..

0
91

प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
8275553131
सिंदेवाही – –कोरोना नागरिकांना सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य बहाल करन्यात महत्वपूर्ण भूमिका बजाविनाऱ्या सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही ग्राम पंचायतमधिल सफाई कर्मचारी वर्गाचा सिंदेवाही बामसेफ यूनिट जिल्हा चंद्रपूरच्या वतीने
अल्पोपहार व चाय- बिस्किटे वितरित करून अभिनंदन व स्वागत नुकतेच करन्यात आले .

कोरोना वैश्विक महामारीत एकीकडे विविध सरकारी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सोबतच लोकप्रतिनिधी ,सामाजिक संघटना व पत्रकार मंडळी नागरिकांना कौरौणा योद्धा म्हणुन सेवा देत आहेत .
त्यातच गावस्तरावरील जनता व प्रशासनाचा दुवा असणाऱ्या ग्राम पंचायत चे यात विशेष योगदान राहिले आहे .

याची बामसेफ सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांनी दखल घेत बामसेफ चे जिल्हा संयोजक इंजि.चेतन वानखेडे यान्च्या मार्गदर्शणाखाली सिंदेवाही बामसेफ च्या वतीने सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोनवाही ग्राम पंचायतमधिल कार्यरत सर्व सफाई कर्मचारी वर्गाचा अल्पोपहार व चाय -बिस्किटे वितरित करुन नुकताच सत्कार करन्यात आला .

याप्रसंगी बामसेफचे तालुका संयोजक शीलपाल ताम्बागडे ,मिडिया प्रभारी प्रा .भारत मेश्राम आदी पदाधिकारी उपस्थित होते .