आकोलखेड येथे आमदार अमोल मिटकरींचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

तालुक्यातील आकोलखेड येथे गुरुवार दिनांक ३ डिसेंबर ला सायंकाळी ७.३० वाजता फुले,शाहु,आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्था,आकोलखेड व्दारा संचालित छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिकेच्या वतीने अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी युपीएससी,एमपीएससी,बँक,रेल्वे,पोलीस भरती यासह विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाला अकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास थोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फुले,शाहु,आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ललित नगराळे व संस्थेचे सचिव अमोल किटके यांनी केले आहे.