दिल्ली येथील किसान आंदोलनाला भाकपा चा पाठिंबा… किसान कामगार नेते कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी एस. डी. ओ.मार्फत पंतप्रधान यांना निवेदन…

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

ब्रम्हपुरी :- शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले तीन विध्येयक मागे घेण्यात यावे यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या वतीने दिल्ली येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन दडपून टाकण्याचा भाजप सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने दि.2 डिसेंबर 2020 रोजी निदर्शने करून दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ब्रम्हपुरी येथे किसान कामगार नेते कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात एस.डी. ओ.मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधात पारित करण्यात आलेले 3 कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

केंद्र सरकारने कोरो ना काळाचा फायदा घेऊन शेतकरी विरोधी 3 कायदे केले आहेत. त्या विरोधात देशभर अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या वतीने या संबंधातील वटहुकूम निघाल्या पासून सर्व किसान संघटना त्या विरोधात आंदोलन करीत आहेत.

देशभरातील 243 किसान संघटना एकत्र येत संयुक्त कृती समितीच्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर 2020 भारत बंद करून चलो दिल्ली चा नारा देत किसान आपल्या ट्रॅक्टर, टाल्यासह शांततेच्या मार्गाने दिल्ली कडे जात असताना केंद्र सरकारने दिल्लीच्या वेशिवरच आंदोलन चिरडण्या च्या उदेश्याने गॅस व अश्रुधारा चा मारा केला पाण्याच्या फवाऱ्या सह आंदोलन चिरडून टाकण्या च्या उदेशाने पोलिसांनी दडपशाही केली या सगळ्याला न जुमानता किसान दिल्ली पर्यंत पोहचला आहे व आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. परवा हे आंदोलन केवळ पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांचे भासवण्याच्या दृष्टीने पंजाब व हरियाणा सबंधित 52 संघटना बरोबर चर्चा करण्याचा हट्टहास सुरू आहे.

हे आंदोलन अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या वतीने गेली 2 वर्ष सर्व देशभर सुरू आहे परंतु आंदोलना बरोबर चर्चा करायची असल्यास समन्वय समितीच्या सर्व घटक संघटना प्रतिनिधी बरोबर केली पाहिजे, आणि सरकारने वेळकाढू धोरण स्वीकारण्या पेक्षा शेतकरी विरोधी 3 ही कायदे परत घ्यावेत. अन्यथा दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सहभागी होऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही किसान कामगार नेते कॉ. विनोद झोडगे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देतांना राजेश खरकाटे, अनिल कांबळी, रमेश तलमले, विनोद राऊत, मिलिंद मेश्राम यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.