जागतिक एड्स जनजागृती अभियान व जागतिक विकलांग दिवसा निमित्त गांधी चौक कन्हान येथे भ०य रक्तदान शिबिर

 

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र)- जागतिक एड्स जनजागृती अभियान व जागतिक विकलांग दिवसा निमित्त कन्हान शहर विकास मंच व्दारे रक्तदान शिबीर आणि दिव्यांग बांधवांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन जवळ गांधी चौक कन्हान येथे गुरूवार (दि.३) डिसेंबर ला सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून महादानाचे सहभागी व्हावे असे आवाहन कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे हयानी केले आहे. शिबीरांच्या यशस्विते करिता आपातकाल सामाजिक संघटना कन्हान, ग्रामीण पत्रकार संघ कन्हान, नेहरू युवा केंद्र नागपूुर , युवा चेतना मंच सह कन्हान विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , विनोद कोहळे सहित मंच पदाधिकारी सहकार्य करित आहे.