माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडून भालके कुटुंबीयांचे सांत्वन

 

 

निरा नरसिंहपुर  दिनांक: 2 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकोली तालुका पंढरपूर येथे भालके कुटुंबीयांची मंगळवारी (दि.१) भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्व.आ.भारत नाना भालके यांच्या अनेक आठवणींना हर्षवर्धन पाटील यांनी उजळा दिला व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी स्व. भारत नानांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे सांत्वन केले.

आ.भारतनाना हे धाडसी नेतृत्व होते.विधीमंडळात आम्ही अनेक वर्षे बरोबर काम केले.या कालावधीतील अनेक प्रसंग हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.तसेच सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतनाना भालके यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा माझ्या उपस्थितीत झाल्याची आठवणही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली याप्रसंगी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक संचालक,  व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

———————————————————-

फोटो:-माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकोली येथे भालके कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160