अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू, उकणी चेकपोस्ट जवळील घटना

 

वणी : परशुराम पोटे

कोळसा भरलेल्या ट्रकच्या चाकामध्ये दबून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.2 डिसेंबर ला दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास उकणी खदानीच्या चेकपोष्ट जवळ घडली.
मारोती सुनिल वरवाडे (२४) रा. शिरपूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मृत्यू देहाचा पंचनामा करून शव विच्छदनाकरिता वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शव विच्छेदन करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी कलम 279,304 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
*अपघाताला जबाबदार कोण?*
उकणी चेकपोष्टकडे जाणारा रस्ता अरुंद असून खदानीत जाणाऱ्या गाड्या सुसाट वेगाने धावतात. चेकपोष्ट वर नेहमी गाड्यांची वर्दळ रहात असून गाड्या नियमबाह्य पद्धतिने उभ्या असतात, असे बोलले जात असून
ट्रिप मारण्याच्या धुंदीत ट्रक चालक अती वेगाने गाड्या चालवीत मिळेल त्या जागी गाडी घुसवीण्याचा प्रयत्न करित असल्याने खदानीत गाड्या नेहमीच एकमेकांना भिडत असतात. ट्रिप मारण्याचे दिलेले टारगेट ड्रायव्हरांमध्ये स्पर्धा निर्माण करत असून याच स्पर्धेतून खदान प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे अपघात वाढु लागले आहेत. खदानीतील चेकपोष्ट जवळील अरुंद रस्ते व आडवी तिडवी उभी असणारी वाहने अपघाताना निमंत्रण देत असून अपघातात चालकांचे नाहक बळी जात आहे.याला जबाबदार कोण? असा प्रश्न या घटनेमुळे समोर येत आहे.